। अहमदनगर । दि.28 जानेवारी । नगर शहरामधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटार सायकल चोरून नेणारे गुन्हेगार कोतवाली पोलीसांकडुन जेरबंद करण्यात आले आहेत.
याबाबत माहिती अशी की, शहरातून दुचाकी चोरणारे व दाळमंडई येथील दुर्गा देवी मंदिरात चोरी करणार्या चौघांना कोतवाली पोलिसांनी कायनेटीक चौकात अटक केली.
यामध्ये शुभम बबन भापकर (वय 21 रा. गुंडेगाव ता. नगर), कृष्णा बाबासाहेब गुंड (वय 25 रा. मेहेरबाबा वेशी जवळ आरणगाव ता. नगर), अभिषेक संतोष खाकाळ (वय 20 रा. संभाजीनगर, व्हीआरडीई गेट आरणगाव), जालींदर अर्जुन आमले (वय 21 रा. आमले मळा, आरणगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 28 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या चौघांकडून पोलिसांनी चार चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. मोमिन तस्दीक मोमिन इद्रीस (वय 19 रा. मुकुंदनगर) यांची दुचाकी शनी चौकात भोला जिम जवळून चोरीला गेली होती.
याप्रकरणी इद्रीस यांना कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्यासह इतर चोरीच्या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलिसांकडून सुरू असताना वरील चार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली.
सदरचे आरोपी कायनेटीक चौकात येणार असल्याची खबर पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी डिबी पथकाचे पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, योगेश कवाष्टे, नितीन शिंदे, सलिम शेख, संतोष गोमसाळे,
अभय कदम, दिपक रोहकले, अमोल गाढे, सोमनाथ राउत, अतुल काजळे, राहुल गुंडू, प्रशांत राठोड यांच्या पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना केल्या. पथकाने कायनेटीक चौकात सापळा लावून वरील चौघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली असून चोरीच्या दुचाकी काढून दिल्या आहेत
Tags:
Ahmednagar