चोरी करणार्‍या तिघांना रंगेहात पकडले


। अहमदनगर । दि.25 जानेवारी । बंद कोप्यांचे कुलूप तोडून तिघांनी आत प्रवेश केला व आतील 25 किलो वजनाच्या चार गोण्या अशी 100 किलो बाजरी आणि इंडिका कार (क्रमांक एमएच बेचाळीस ए 1411) चोरून नेल्या, परंतु आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या दक्षतेने बाजरी चोरून नेणार्‍या तिघांना इंडिका गाडीसह रंगेहात पकडले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे राज शामू बर्डे (वय 35), गीता राज बर्डे (वय 32, राहणार वडाचे लवान, कनगर, राहुरी) यांना रंगेहात पकडले. त्यांचा एक साथीदार पसार झाला. ही घटना कर्जत तालुक्यातील येसवडी शिवारात घडली. 

याप्रकरणी कर्जत पोलिसांनी आप्पा धनसिंग भिल्ल (वय 28 काकदया, शहादा, नंदुरबार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस हवालदार चव्हाण करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post