कोरोना नियमांचे उल्ल्ंघन करणार्‍यांची कापडबाजरात मनपा आरोग्य विभागाकडून आरटीपीसीआर चाचण्या

। अहमदनगर । दि.23 जानेवारी । कोरोनाचा प्रसार सगळीकडे होत आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजारापासून स्वतःचा व इतरांचा बचाव करण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. आज कापडबाजार येथे नियमांचे उल्लंघन करणार्‍याची आरटीपीसीआर चाचणी नगर मनपाच्या आरोग्य विभाग व दक्षता पथकाच्या वतीने करण्यात आल्या. यामध्ये पोझिटीव्ह आलेल्यांची रवानगी नटराज कोव्हीड सेंटरमध्ये करण्यात आली.

कापड बाजार येथील काही दुकानांमध्ये गर्दी करण्यात आली होती. याची माहिती महानगरपालिकेच्या दक्षता पथकाला मिळाली. यावर पथकाने कापडबाजार येथे जावून तेथील तीन दुकानामधील सर्वांची आरटीपीसीआर चाचणी केली. यामध्ये तीघे पॉझिटिव्ह आढळले  आहेत. त्यांना महापालिकाचे नटराज कोव्हीड सेंटर येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

यावेळी  कोरोना नियंत्रण कक्ष पर्यवेक्षक योगेश औटी, सुपरवायझरला टेक्निशियन सुपरवायझर अमोल लांडे, दक्षता पथकाचे भास्कर अकुबत्तींन, अमोल लहारे, विष्णू देशमुख, लॅब टेक्निशियन गणेश वाघ, अक्षय चाहेर, बिलाल सय्यद, अरबाज शेख, धनंजय गीते, उज्वला आगरकर, डी.ई.ओ.ओम शर्मा, नाझीम शेख, आनंद गोंधळे, अनिस शेख उपस्थित होते अशी माहिती दक्षता पथक सनियंत्रण अधिकारी शशिकांत नजान यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post