ब्युटीपार्लरची कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी मारला लाख रुपयांवर डल्ला

। अहमदनगर । दि.19 सप्टेंबर । नेवासा रोड नेवासा फाटा रस्त्यावर पावन गणपती समोर असलेल्या साक्षी ब्युटीपार्लर या दुकानाची कडी आणि कोयंडा उचकाटून चोरट्यांनी पार्लरमधील महागड्या साड्यासह लेडीज टॉप, ज्वेलरी साहित्य व रोख रक्कम असा सुमारे एक लाखांचे साहित्य ब्युटीपार्लर दुकाण फोडून चोरुन अज्ञात चोरटे पसार झाले.

ही घटना शुक्रवारी ही समोर आली. याबाबत ब्युटीपार्लरच्या संचालिका अश्विनी अमोल पागिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, नेवासा रोड - नेवासा फाटा रस्त्यावर पावन गणपती समोर असलेल्या अश्विनी पागिरे यांच्या साक्षी ब्युटीपार्लरचे दुकानाचा कडी - कोयंडा उचकाटून अज्ञात चोरट्यांनी ब्युटीपार्लरमधील वेगवेगळ्या दराच्साड्या, लेडीज व इतर लेडीज सावि कपडे तसेच ग्रॅम ज्वेलरीचे नग साहित्य तसेच बांगड्या व रोख रक्कम मिळून असा लाखो रुपयांचे साहित्य ब्युटीपार्लरचे दुकाण फोडून चोरट्यांनी साहित्य पसार केले आहे.

याबाबत अश्विनी पागिरे ांनी दलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिस
ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नेवासा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार तुळसीराम गिते अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post