। शिर्डी । दि.18 सप्टेंबर । देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा व समर्पण उपक्रमा अंतर्गत भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेनुसार रक्तदान शिबिर श्री साईबाबा संस्थानच्या साईनाथ रक्तपेढी येथे युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, उत्तरनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपाध्यक्ष अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश सदस्य किरण बोराडे, शहराध्यक्ष योगेश आण्णा गोंदकर यांच्या शुभहस्ते भारतमाता या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी उत्तर नगर जिल्हा प्रभारी कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष राज डेरे व सरचिटणीस योगीराज परदेशी यांनी भेट दिली. भाजपा पदाधिकारी, भाजपाचे शहर उपाध्यक्ष रविंद्र गोंदकर, नगरसेवक मंगेश त्रिभुवन, अशोक गोंदकर, जिल्हा सरचिटणीस नरेश सुराणा, चिटनीस सोमराज कावळे, बद्रीनाथ वाघचौरे तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस लखन बेलदार,
उपाध्यक्ष प्रसाद शेलार, सचिन घुले, विकास गोंदकर, संघटक संतोष बहिरट, सचिव पंकज दुशिंग, विनोद गोंदकर, सतिष गायकवाड, प्रशांत थोरात, राजेंद्र बलसाने, हितेश मोटवानी ,अक्षय मुळे, सोशल मीडिया प्रमुख सागर एकनाथ जाधव, सहसोशल मीडिया प्रमुख विशाल पवार, प्रसिद्धीप्रमुख महेश सुपेकर, राहुल घुले, सदस्य अमोल सोमवंशी, अमर ठाकुर, सागर रोकडे , पत्रकार सचिन सालपुरे,
युवा वॉरीयस अध्यक्ष तुषार महाजन, मयूर आडंगळे, सागर भोईर, विजय कोळपकर, ऋतिक उपाध्य, ऋषिकेश कोडिलकर, सागर कुमट, संदीप एखंडे, बाबासाहेब खरात,अभिषेक उपाध्ये आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रक्तदान विभाग शिर्डी शहर संयोजक म्हणून प्रसाद शेलार यांची नियुक्ती करण्यात आली.
