जामखेडमध्ये जुगार अड्डयावर छापा ; पंधरा जणांवर गुन्हा दाखल

। अहमदनगर । दि.18 सप्टेंबर । जामखेड तालुक्यातील वंजारवाडी शिवारात पोलिसांनी दि. 17 रोजी भल्या पहाटे जुगार अड्ड्यावर छापा टाकत सुमारे पाच लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या छाप्यात सुमारे 15 जुगार्‍याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

एका ऊसाच्या शेतात बांधलेल्या झोपडीत अड्डा सुरू होता. या छाप्यात चार मोटारसायकली, एक झायलो गाडी तसेच रोख 1 लाख 6 हजार रुपये असा एकूण 5 लाख 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस काँस्टेबल संदीप आजबे यांच्या फिर्यादीवरून

दादा लक्ष्मण ईपार (रा. वंजारवाडी), बाळासाहेब हरीभाऊ साठे (जवळके), घनश्याम कैलास डोके (खर्डा), हनुमंत उत्तम देवकर, अजय बबन साठे (रत्नापूर), राजेंद्र उद्धव डहाळे (तरडगाव), रामा जानू आव्हाड, महादेव लक्ष्मण शेतकर, संभाजी सीताराम कराड, संदीप भीमा भोसले (वंजारवाडी),

हर्षद नजमो शेख (धनेगाव), किरण मुकुंद गोलेकर (खर्डा), महेश शहाजी काळे (धनेगाव), प्रकाश रामकृष्ण गोलेकर (खर्डा), योगेश अण्णा सुरवसे (खर्डा) या 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस नाईक अविनाश ढेरे, विजयकुमार कोळी, आबासाहेब आवारे, संग्राम जाधव, अरुण पवार, संभाजी शेंडे, बिराजदार यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस नाईक संभाजी शेंडे हे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post