मराठा सेवा संघाने लाखो लोकांना एकत्र आणण्याचे काम केले : इथापे

। अहमदनगर । दि.03 सप्टेंबर । 1990 सालापासून मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रम कपणे वार करणारी तलवार अशी ओळख धारण करणारी सामाजिक चळवळ आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचाराने वाढत असलेली वैचारिक चळवळ आहे.

या संघटनेच्या माध्यमून स्त्री शक्तीला श्रद्धा स्थान मानून स्त्रीयांचा सन्मान करण्याची शिकवण देऊन लाखो लोकांना एकत्र आणले आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुरेश इथापे यांनी केले.

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त माँ साहेब जिजाऊ व छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुरेश इथापे, मनोज पारखे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी किरण आव्हाड, बी. बी. सिनारे, गौतम देवळालीकर, मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश इंगळे, संचालक उदय अनभुले, अमोल लहारे, इंजिनिअर श्रीकांत निंबाळकर, गणेश घिगे, अशोक वारकड आदी उपस्थित होते.

बी.बी.सिनारे म्हणाले, समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यासाठी समाजाला सांस्कृतिक वारसा देणार्या राष्ट्रपुरुषांची साखळी समजावून सांगण्याचे काम सेवा संघाचे कार्यकर्ते करत आहेत. यावेळी बबन सुपेकर, रणजित रक्ताटे, प्रशांत बोरुडे, किशोर कराळे, प्रितेश बोरुडे, सूर्यकांत कडू, महादेव कोतकर, अशोक कराळे आदी उपस्थित होते.

 

Post a Comment

Previous Post Next Post