। अहमदनगर । दि.26 सप्टेंबर । शेतकर्यांविरोधात करण्यात आलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला अहमदनगर महनगरपालिका कामगार संघटेने पाठींबा देण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता द्वारसभा आयोजित केली आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अनंत लोखंडे आणि चिटणीस आनंदराव वायकर यांनी दिला आहे.
दि.27 सप्टेंबर 2021 रोजीच्या भारत बंद व शेतकरी बांधवांच्या आंदोलनास पाठिंबा देणेसाठी अहमदनगर महानगर पालिका कामगार युनियन मार्फत दि.27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता अहमदनगर महानगर पालिका मुख्यालय येथे द्वार सभा आयोजित केलेली आहे.
सदर द्वारसभेमध्ये शेतकरी बांधवांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात येणार आहे. यासाठी सर्व कर्मचारी यांनी सोमवार दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता द्वारसभेस उपस्थित राहावे असे आवाहन अहमदनगर महानगरपालिका कामागर युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे आणि चिटणीस आनंदराव वायकर यांनी केले आहे.
Tags:
Ahmednagar
