सलग दुसर्‍या आठवड्यातही सोने स्वस्तच !


। नवीदिल्ली । दि.28 सप्टेंबर । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात दिवसेंदिवस घसरण सुरु असल्याची चित्र आहे. गेल्या आवठड्यापासून सोन्याच्या दरात घसरणच पाहिला मिळाली आहे. आज बाजारपेठ उघडल्यानंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवण्या आली आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) ऑक्टोबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.15 टक्क्यांनी घसरला तर चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची घसरण झाली आहे. यापूर्वी सोमवारी सोन्याच्या दरात किंचीत उसळी पाहायला मिळाली होती. मात्र ती जास्त काळ तग धरु शकली नाही. ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचा भाव 0.33 टक्क्यांनी वाढला होता.

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 45,280 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 45,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 60,250 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

आजचा भाव काय ?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,280 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 46,280 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 44,480 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,620 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,280 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46,280 रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 603 रुपये आहे. 


(वरील सोन्याचे दर सूचक आहेत यामध्ये कोणत्याही करांचा समावेश नाही यासाठी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधावा.)

Post a Comment

Previous Post Next Post