। अहमदनगर । दि.28 सप्टेंबर । नवी दिशा, नवा वचार घेऊन मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडचे प्रविण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगर दक्षित जिल्हा पुनर्गठन-पुनर्बांधनी बैठक आयोजिक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गोरख दळवी आणि कार्याध्यक्ष अवधूत पवार यांनी दिली आहे.
मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडची बैठक माळीवाडा येथील मराठा सांस्कृतीक भवन येथे होणार आहे. बुधवारी सकाळी ठिक 11 वाजता बैठक सुरु होणार असल्याची माहिती दळवी यांनी दिली आहे. या बैठकीस प्रमुख उपस्थिती प्रदेश उपाध्यक्ष छगन दादा शेरे, शरद चव्हाण, तर सन्मानीय उपस्थिती दशरथ गव्हाणे, रमेश हंडे यांची राहणार आहे. या बैठकीस कोरोना नियमांचे पालन करण्यात येणार आहे.
बैठक यशस्वीतेसाठी व पुर्नबांधणीसाठी जिल्हाध्यक्ष गोरख दळवी, कार्याध्यक्ष अवधूत पवार, अरविंद कापसे, राजाभाऊ लोटके, कैलास वाघस्कर, सागर जाधव, सोमनाथ गुंडद्व पोपटराव चेमटे, निलेश तनपुरे, नाना शिंदे, माणिकराव वाघस्कर, नवनाथ मोरे, वैभव दळवी, शंभू कदम, सागर बारहाते, मलेश पवार, श्रीकांत धोत्रे आदी प्रयत्नीशील आहेत.
Tags:
Ahmednagar

