याप्रसंगी मेजर जनरल पदमसिंग शेखावत यांनी रिकुड पंकज यादव यास जनरल सुंदरजी गोल्ड मेडल ने, रिकुड दयाराम गुर्जर यास के एल डिसोझा सिल्वर मेडलने तर आशिक राय यास जनरल पंकज जोशी ब्राँझ मेडल ने गौरविले. प्रशिक्षणार्थी जवानांनी आपापल्या धर्मग्रंथावर हात ठेवून अखंडता, ऐकता व देशसेवेसाठी एकनिष्ठेची शपथ ग्रहण केली.
लष्कराच्या बँडपथकाने सादर केलेल्या धूनवर एमआयआरसीमध्ये 36 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 241 जवानांच्या तुकड्या संचलनासाठी मैदानावर आल्या. मेजर जनरल पदमसिंग शेखावत (सेना मेडल एमजी अॅडमिन सदर्न कमांड) यांनी मानवंदना स्वीकारली.
त्यानंतर एमआयआरसी संस्थेने लष्करासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आलेले निशाण (ध्वज) आणण्यात आले व सर्वांनी उभे राहून या ध्वजाला सलामी दिली. धर्मगुरुंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा व समर्पणाची शपथ दिली.
त्यानंतर सर्वांत पुढे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या तुकड्या, त्याच्या मागे एमआयआरसीचे निशाण व बँडपथक आणि सर्वांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांच्या तुकड्या अशा क्रमाने संचलन झाले. या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली.