...त्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्या : बोरकर

मिस्किन मळा रोड व गुलमोहर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून द्या : माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर


। अहमदनगर । दि.18 सप्टेंबर । प्रभाग क्रमांक चार मधील मिस्किन मळा रोड व गुलमोहर रोड हे दोन्ही रस्ते सावेडी उपनगरला जोडणारे महत्त्वाचे रस्ते आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. यातुन छोटे मोठे अपघातही घडले आहेत. तरी मनपा आयुक्तांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक अजिंक्य बोर यांच्यासह शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी बारेकर यांच्या समवेत स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, चिंटू गंभीर, जयकुमार रंगलानी,गिरीश मंगलानी,बाबू नवंलानी,हर्षल वाकळे, हर्षल बांगर आदी उपस्थित होते.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचते, वाहनचालकांना वाहने चालवताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा छोटे-मोठे अपघात देखील होतात. तरी मनपाच्या वतीने लवकरात-लवकर या दोन्ही रस्त्यांच्या पॅचिंगचे काम सुरू करावे

तसेच याच बरोबर या दोन्ही रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून पुढील पंधरा ते वीस वर्ष पुन्हा-पुन्हा रस्ते तयार करण्याची वेळ येणार नाही अशी मागणी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post