। अहमदनगर । दि.04 सप्टेंबर । महामार्गावर रस्ता लूटमार करणार्या टोळीचा म्होरक्या सागर आण्णासाहेब भांड (वय 25, रा.ढवण वस्ती, सावेडी) यास पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथून जेरबंद करण्यास नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
आरोपी सागर भांड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत. नगर शहरासह जिल्ह्यात महामार्गांवर लुटमार करण्याच्या अनेक घटना काही दिवसांत घडलेल्या आहेत. त्यामुळे या टोळीचा छडा लावण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना दिल्या होत्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरु केला होता. अशातच 14 ऑगस्ट रोजी दिलीप तमनर हे संध्याकाळच्या वेळेस खंडाळा (ता. श्रीरामपूर) येथून तमणार आखाडा (ता. राहुरी) कडे नगर मनमाड रोड ने आपल्या घराकडे जात असताना या टोळीतील काही लोकांनी तमनर यांना अडवले होते, यावेळी त्यांच्या गाडी सह मोबाईल आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेण्यात आला होता.
या प्रकरणी दिलीप तमनर यांनी राहुरी पोलीस स्टेशन मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना यातील आरोपी सागर भांड हा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव या ठिकाणी असल्याची खात्रीशीर माहिती भेटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून सागर भांड याच्यासह नितीन माळी, गणेश माळी, रवी लोंढे, निलेश शिंदे, रमेश शिंदे यांना ताब्यात घेतले आहे.
या आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके तसेच साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे,हेड कॉन्स्टेबल ,दत्तात्रय गव्हाणे, पोलीस नाईक सुरेश गवळी, शंकर चौधरी, विशाल माळी, सचिन अडबल, दीपक शिंदे, प्रकाश वाघ, संभाजी कोतकर या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी मेहनत घेतली.
आरोपी सागर भांड हा महामार्गावर रस्ता लूटमार करणार्या टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत.

Tags:
Crime