। अहमदनगर । दि.04 सप्टेंबर । कर्जत तालुक्यातील सुपेकरवाडी येथे शुक्रवारी पहाटे दोन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी रोकड लंपास केली असल्याची माहिती पोलीस पाटील समीर जगताप यांनी दिली.
संतोष सुपेकर यांच्या घरात चोरटे घुसले. त्यानंतर घरात उचकापाचक करून संतोष उत्तम सुपेकर यांच्या पँटच्या खिशातील तसेच पत्नीच्या बॅगेतील रोकड लंपास केली. साडेतीन वाजेच्या सुारास किरण भाऊसाहेब सुपेकर यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न झाला.
मात्र महिला जाग्या झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला आहे.ग्रामसुरक्षा यंत्रणेचाही वापर करण्यात आला. ग्रामस्थ ही रात्रीच्या वेळी जमा होऊन चोरट्याचा शोध घेत होते. परंतु अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पळून गेले आहेत.
या गावात चोर्या झाल्याने ग्रामस्थांमध्येघाबराचे वातावरण आहे.सहाय्यक उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
Tags:
Ahmednagar
