लोक अदालतमध्ये सहभाग घेऊन शास्ती माफीचा लाभ घ्यावा : सभापती घुले

। अहमदनगर । दि.21 सप्टेंबर । अहमदनगर महानगरपालिका व जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2020-2021 अखेर थकबाकीची व शास्तीपोटी ज्याची रक्कम वीस हजार पेक्षा जास्त थकीत आहे

अशा मालमत्ताधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तरी मालमत्ता कराच्या थकबाकी वर आकारण्यात आलेल्या शास्तीरकमेवर तडजोड करण्यासाठी दिनांक 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे थकित मालमत्ताधारकांनी सकाळी 9.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उपस्थित राहून 75 टक्के शास्ती माफीचा फायदा घेऊन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post