खून प्रकरणातील पळून जाणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद

। अहमदनगर । दि.21 सप्टेंबर । राहुरी येथील साक्षी हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरुन वेटरची खून करुन फरार झालेला आरोपी बाहेरगावी पळून जाण्याचे तयारीत असताना अहमदनगर पुणे बसस्थानकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. नामदेव केशव दराडे (वय 30, रा. गोळेगाव, ता.शेवगांव, जि.अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्याचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, राहुरी कोंढवड येथील हॉटेल साक्षी मधील परप्रांतीय वेटरची हत्या करून प्रसार झालेल्या नामदेव दराडे यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडले. ही कारवाई स्टेशन रोडवरील पुणे बस स्थानक क्रमांक तीन येथे केली.

दि.19 रोजीचे मध्यरात्री नगर-मनमाड रोडवरील राहूरी शिवारातील साक्षी हॉटेल येथे वेटरचे काम करणारा नामदेव (मामा) याने किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हॉटेलमध्ये काम करणारा वेटर सोनू नारायण छत्री (वय 27 वर्षे, रा. जोडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) याच्या डोक्यामध्ये लोखंडी पहारीने वार करून त्याची हत्या करुन फरार झाला होता. या घटनेबाबत साक्षी हॉटेलचे मालक प्रमोद म्हसे (वय 26, रा. कोंढवड, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व श्रीरामपूर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि गणेश इंगळे, पोसई सोपान गोरे, पोहेकॉ विश्वास बेरड, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, सुनिल चव्हाण, पोना दिपक शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, पोकॉ सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रविन्द्र घुंगासे, मयूर गायकवाड, रोहित येमूल, विनोद मासाळकर, मच्छिन्द्र बर्डे, विजय धनेधर, चालक पोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post