। अहमदनगर । दि.23 सप्टेंबर । किरकोळ कारणावरून दोघांवर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री 9 वाजता नगर-औरंगाबाद रस्त्यावरील रेणुकानगर येथे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी जतीन चेतन सैनी, सपना चेतन सैनी (दोघे रा. रेणुकानगर) यांच्याविरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अमजद रशीद शेख (वय 32, रा. रेणुकानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शेख यांची पत्नी त्यांच्या घरासमोरील ओटा झाडत असताना नितीन सैनी व मितीन सैनी हे दोघे चिखलाचे पाय घेऊन ओट्यावरून पळत असताना शेख यांच्या पत्नीने त्यांना चिखलाचे पाय घेऊन येवू नका, असे सांगितले.
त्यानंतर रात्री 9 वाजता शेख यांचे भाऊ रेहान हे या प्रकरणाबाबत त्यांना समजावून सांगत असताना, राग येऊन सपना व जतीन यांनी रेहान यांना शिवीगाळ करून जतीन सैनी याने त्याच्या हातातील चाकु रेहान यांच्या पोटात भोसकून जीवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केले.
त्यांना वाचविण्यासाठी फिर्यादी शेख हे मागे वळाले असता त्याने त्यांच्याही पाठीच्या मागे कमरेवर चाकूने भोसकून जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जे.सी. मुजावर करीत आहेत.