। अहमदनगर । दि.12 सप्टेंबर । शासनाच्या नियमानुसार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, 10 वी आणि 12 वी मध्ये 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणार्या प्रत्येक मंडळातील पहिले पाच विद्यार्थी तसेच साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळवणारे, संगणक क्षेत्रात अति उत्कृष्ट कामगिरी करणारे, पूर, जळीत, दरोडा, अपघात अगर इतर
नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम कारणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरावर रुपये 10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजाराचा पुरस्कार, सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र देण्याची तरतूद आहे.
जिल्हयातील जे माजी सैनिक, पत्नी, पाल्य वरीलप्रमाणे अर्हता प्राप्त करत असतील, त्यांनी आपले प्रस्ताव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहमदनगर यांच्याकडे 15 ऑक्टोबर 2021पर्यंत सादर करावेत. या सवलतीचा जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे यांनी केले आहे.
Tags:
Ahmednagar
