। अहमदनगर । दि.22 सप्टेंबर । येथील नोंदणी व मुद्रांक विभागातील राजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्यावतीने प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार (दि.21) पासून बेमुदत संप पुकारण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष अनिल जगधने यांनी दिली.
या संपामुळे जिल्ह्यातील दस्त नोंदणीचे व खरेदी-विक्रीचे कामकाज ठप्प झाले आहे. नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तातडीने कराव्यात, पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू करण्यात येऊ नये, रिक्त पदे तातडीने भरावीत, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अधिकारी व कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची तातडीची मदत द्यावी व अनुकंपा तत्त्वावर नोकरी समावेश करून घ्यावा,
तसेच रेरा कायद्यानुसार नोंदणी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर झालेल्या कारवाया मागे घेण्यात याव्यात या प्रमुख मागण्यांसाठी नगर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक श्रेणी-1, वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक 100 % संपामध्ये सहभागी झालेले आहेत. जिल्ह्यात एकूण 17 दुय्यम निबंधक कार्यालयांपैकी 15 दुय्यम निबंधक कार्यालय शंभर टक्के संपात सहभागी झाले आहेत.
त्यामुळे नगर जिल्ह्यातील दस्त नोंदणीचे कामकाम पुर्णपणे ठप्प झालेले आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा अहमदनगर या संघटनेचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष विजय गावडे, बाळासाहेब वैद्य व वासुदेव राक्षे इत्यादी पदाधिकार्यांनी सदरच्या संपामध्ये सहभाग नोंदवून पाठिंबा दिला असल्याचे अध्यक्ष अनिल जगधने यांनी सांगितले.

Tags:
Ahmednagar