। अहमदनगर । दि.22 सप्टेंबर । जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व 80 हजाराचा दंड ठोठावला. कालिदास बाबासाहेब बोडखे (वय 26, रा. पारगाव जि. ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, की फिर्यादी मीना भिवसेन घुले व पत्नी भिवसेन घुले दोघे मृत मुलीचा मुलगा नातू रूद्र यास भेटण्यासाठी 29 मे 2018 रोजी पारगाव, वाळूंज येथे गेले होते. ते नातवाला तु आमच्या बरोबर चल असे म्हणाले असता आरोपी कालिदास बोडखे याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.
यावेळी मच्छिंद्र घुले यांनी तो वाद सोडविला. मात्र, घुले पती-पत्नी घरी जाण्यासाठी निघाले असता आरोपी कालिदास बोडखे याने त्यांना फावड्याने मारहाण करून जबर जखमी केले. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सरकार पक्षाचा पुरावा व युक्तिवाद ग्राह्यधरून वरीलप्रमाणे शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अनिल सरोदे यांनी बाजू मांडली.

Tags:
Crime