नगर-मनमाड रोडवर विश्रांतीसाठी थांबलेल्या वाहनचालकास मारहाण करुन लुटणारे जेरबंद

। अहमदनगर । दि.24 सप्टेंबर । रात्रीच्या वेळी अहमदनगर-मनमाड महामार्गावर हॉटेल समोर विश्रांतीसाठी थांबलेला वाहन चालकांना धारदार हत्याराने मारहाण करुन लुटमार करणारे आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.आरोपींकडून सुमारे 41 हजाराचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपीमध्ये समीर उमर कुरेशी (वय 19, रा.सुभाषनगर, धारणगाव  रोड, कोपरगाव),सोहेल जावेद पठाण ( रा.सुभाषनगर, धारणगाव रोड, कोपरगांव), सौरभ रामदास सातोटे ( सुभाषनगर, धारणगाव रोड, कोपरगांव) यांना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेतले आहे.

माहिती अशी की, दि.19 सप्टेंबर रोजीचे रात्री उंकार उर्फ अर्जून शंकरलाल मेवाडा (वय 56, धंदा ड्रायव्हर, रा.पिरझलीर, ता.बडनगर, जि.उज्जैन, मध्यप्रेदश) व त्यांचे मित्र ड्रायव्हर गोकूळसींग रजपूत असे दोन टेम्पो नं.एमपी-09 जीजी/226 व टेम्पो नं.एमएच 04 जीएफ 7264 असे दोन टेम्पो नगर-मनमाड महामार्गावरील येसगांव फाटा येथील राजस्थान ढाब्यासमोर उभे करुन कॅबीनमध्ये झोपलेले असताना

अज्ञात चोरट्याने त्यांचे टेम्पोचे कॅबीनचा दरवाजा उघडून फिर्यादी यांचे पँन्टचे खिशामध्ये हात घातला असता फिर्यादी यांना जाग असल्याने फिर्यादीने चोरट्याचा हात पकडून आरडाओरडा केला असता आरोपीने फिर्यादीचे हातावर, दंडावर, मनगटावर, पायावर कमरेवर चाकुने वार केले.

त्याचवेळी फिर्यादीचे मित्र गोकूळसिंग रजपूत हे सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांचे पोटावर चाकूने वार करुन उंकार मेवाड यांचे 10,000/- रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरीने चोरुन नेला. या घटनेबाबत कोपरगांव पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोपरगावचे पोलिस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षकांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि समोनाथ दिवटे, मोहन गाजरे, मनोहर गोसावी, बाळासाहेब मूळीक, विशाल दळवी, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, सागर ससाणे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, रणजित जाधव, राहूल सोळूंके, बबन बेरड यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post