राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आ. लंके यांना मोठी संधी मिळणार : अध्यक्ष अमोल मिटकरी

 । अहमदनगर । दि.18 सप्टेंबर । कोरोनाच्या काळात सर्व रुग्णालये फुल असताना आ. निलेश लंके यांनी शरदचंद्रची पवार यांच्या नावाने कोवीड रुग्णालये सुरु केले.हजारो लोंकाचे प्राण वाचवले. कुंटुब उद्धवस्त होण्यापासून वाचवले.आ.लंके यांचे पुढील भविष्य अतिशय उज्जवल आहे. राष्ट्रवादीला एक साजेसा आमदार लोंकानी दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आ.लंके यांना मोठी संधी मिळणार असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे विधान परीषद अध्यक्ष अमोल मिटकरी यांनी केले.


वडगाव गुफ्ता (ता.नगर) येथील सीना नदीवरील पुलाचे भूमिपूजनाचा कार्यक्रमाप्रंसगी ते बोलत होते. यावेळी आ.निलेश लंके, जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके,जिल्हा परीषद सदस्य माधवराव लामखडे, सरपंच विजय शेवाळे, बाबासाहेब गव्हाणे, सचिन गवारे, गुलाब शिंदे, सुदाम सातपुते, बाबा शेवाळे, राजेंद्र ढेपे , गोरख सातपुते, घनश्याम म्हस्के , संजय जपकर, शिवाजी होळकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मिटकरी म्हणाले की, कोरोनामुळे अर्थ व्यवस्था ढासळली असताना देखील आ.निलेश लंके पारनेर-नगर मतदार संघात शंभर कोटी रुपयाच्या निधीचे काम आणले. त्याच्या काम करण्याची पध्दत पाहून त्यांची कोन्हीही बरोबरी करु नये. राष्ट्रवादीला स्व.आर.आर.आबा याची उनीव होती ती निलेश लंके याच्या रूपाने उनीव भरूण निघाल्याचा भास होतो.

लंके यांनी मतदार संघात विकासाची गंगा आणली. त्याच्या कामाची पध्दत पाहून विद्यार्था त्यांच्या नावावर पीएचडी करतील. साधा झोपडीत राहणारा नेता महाराष्ट्राचे भविष्य असेल याबाबत भाजपच्या मनात शंका नाही एवढे काम लंके यांनी केलें.

यावेळी आमदार लंके म्हणाले कोरोनाची महामारी असताना देखील वडगाव गुफ्ता येथे पाच कोटीचे कामे मंजुर केली. विकासाचे काम चालू केले आहे. विकास कामाबाबत नगर तालुक्यातील सर्व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे.येणार्‍या जिल्हा परीषद निवडणुकीत महाविकास आघाडी ची सत्ता येणार आहे या निवीणुकीत पुर्ण लक्ष देणार आहे.

यावेळीमच्छिंद्र डोंगरे, बाबा शेळके, लखन डोंगरे, बाळू कोर्‍हाळे, गोवर्धन शेवाळे, संतोष गवारे, अमित चौधरी, मोहन गिते, संजय ढेपे, सदाशिव शिंदे, विनोद ठुबे, विकास जगताप, आनंदा कळमकर, सुभाष गव्हाणे, मंगल गोरे  संतोष निमसे सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post