दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तरुणीचा मृत्यू ,वृद्ध महिला जखमी

। अहमदनगर । दि.18 सप्टेंबर ।  नगर मनमाड रोड ने जाणाऱ्या दुचाकी मोपेड वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीने रस्त्याच्या मधील असलेल्या दुभाजकाला धडक दिली अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्याला दिशादर्शक  फलकाचा लोखंडी पोल लागल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर मागे बसलेली वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. ही घटना नगर मनमाड रोड वरील सावेडी गावाच्या शिवारातील हॉटेल लेमन स्पाइस समोर घडली.

या बाबतची माहिती अशी की कोमल यशोदास पाटोळे (वय 18 नागपुर अहमदनगर) ही तरुणी तिची रुथाबाई गुलाब पाटोळे ( वय.67 ) यांच्या सह दुचाकी मोटारसायकल वरुन भरधाव वेगात नागापूर हुन नगर कडे येत असताना कोमल हिचे मोटार सायकल वरील नियंत्रण सुटल्याने 

मोटार सायकल रस्त्याच्या मधील दुभाजकावर चढली त्यामुळे तेथील दिशादर्शक फलकाच्या लोखंडी पोलला धडकली. लोखंडी पोल डोक्याला लागून कोमल पाटोळे हिचा मृत्यू झाला.तर रुथाबाई पाटोळे या गंभीर जखमी झाल्या. नागरिकांच्या मदतीने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी पोलिस नाईक मोरे यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार आंधळे करीत आहे

Post a Comment

Previous Post Next Post