शहरात 19 ठिकाणी गणेश विसर्जन कुंडाचे नियोजन...कुठे करता येणार विसर्जन वाचा सविस्तर

।  अहमदनगर। दि.18 सप्टेंबर ।  शहरासह उपनगरात गणेश विसर्जनासाठी 19 ठिकाणी विसर्जन कुंड तयार करण्यात येणार आहेत. नागरिकांनी जवळच्या परिसरात गणेश विसर्जन करून मनपास सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले आहे.

महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (19 सप्टेंबर) गणेश विसर्जनासाठी शहरासह उपनगरात 19 ठिकाणी विसर्जन कुंड तयार करण्यात येणार आहेत. या परिसरात गर्दी करू नये, तसेच सामाजिक अंतर व मास्कचा वापर करावा असे निर्देश मनपाने दिले.

विसर्जन कुंड बोल्हेगाव (गांधीनगर रोड, भारत बेकरी चौक, मनपाची खुली जागा) वडगांव गुप्ता रोड (मयूर कॉर्नर चौक, खासगी जागा), भिस्तबाग (तपोवन रोड, नाना चौक, खासगी जागा), निर्मलनगर (साईबाबा मंदिर खुली जागा), पाइपलाइन रोड (यशोदानगर विहिर), बालिकाश्रम रोड (महालक्ष्मी उद्यानाजवळ, खासगी जागा),

गंगा उद्यान (मिस्कीन मळा), नेप्ती नाका, कल्याण रोड (बाळाजी बुवा विहीर), सीना नदी पात्र सारसनगर (भिंगार नाल्या लगत सारसपुलाशेजारी, खासगी जागा), बुरूडगाव रोड (साईनगर उद्यान), स्टेशन रोड (शिवनेरी चौक, खासगी जागा),

केडगाव लिंक रोड (क्रांती चौका जवळील, खासगी जागा), केडगाव मोतीनगर (बुद्धविहार शेजारील खुली जागा), केडगाव देवी मंदिरासमोरील जागा, केडगाव मधूर मिलन मंगल कार्यालयाशेजारील (खासगी जागा),

मुकुंदनगर (गोविंदपुरा मारुती मंदिराजवळ), दाणे डबरा, पांजरपोळ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील जागा) आदी ठिकाणी विसर्जनाची सुविधा असणार आहे.महानगरपालिकेने येथे विसर्जन कुंड सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बोल्हेगाव येथील एका कुंडात टँकरने पाणी सोडण्यात आले.

गणेश विसर्जन दोन दिवसांवर आले आहे. रविवारी सकाळपासूनच विविध ठिकाणचे गणपती विसर्जनासाठी विसर्जनस्थळी येत असतात. यावर्षी कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांची संख्या रोडावली आहे.

 

कोवीडच्‍या तिस-या लाटेच्‍या शक्‍यतेचा विचार करता तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या दृष्टिने अहमदनगर महानगरपालिकेच्‍या वतीने रविवार दि. 19/9/2021 रोजी गणेश विसर्जनाकरिता शहरासह उपनगरात 19 ठिकाणी विसर्जन कुंड तयार करण्‍यात आली आहे.. नागरिकांनी आपल्‍या जवळच्‍या परिसरातील कुंडातच गणेश विसर्जन करावे. विनाकारण विसर्जन कुंड परिसरात गर्दी करू नये तसेच विसर्जनाच्‍या वेळी सामाजिक अंतर व मास्‍कचा वापर करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे  असे अवाहन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले आहे.
 

मिरवणुकीला बंदी असल्याने सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचेही विसर्जन वेळेतच करावे लागणार आहे. रात्री 10 पर्यंत विसर्जनसाठी वेळ देण्यात आली आहे. सकाळी सात ते रात्री दहापर्यंत संबंधित प्रभाग समितीतील कर्मचारी विसर्जनस्थळी राहणार आहेत. 

 

Post a Comment

Previous Post Next Post