हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ ; 6 जणांवर गुन्हा दाखल

। अहमदनगर । दि.23 सप्टेंबर । स्वयंपाक करता येत नाही, तसेच माहेराहून गायी विकत घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत यासाठी नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हुसकावून दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील धामोरी येथे घडली  होती. याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरून पती, सासू - सासर्‍यांसह 6 जणांवर पोलिसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबात मिळालेली माहिती अशी की, नेवासा येथील सोनाली सतीश दाणे (वय 21) रा. धामोरी ता. नेवासा हिने फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 8 मे 2021 रोजी सतिश राजेंद्र दाणे रा. धामोरी ता. नेवासा याचेशी विवाह झाला. सासरी नांदत असताना लग्नानंतर 15 दिवसांनी ते 22 सप्टेंबरपर्यंत आरोपी यांनी संगनमताने तूला स्वयंपाक नीट करता येत नाही. तू पटत नाही. माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ व मारहाण करुन धमकी देवून वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला व घरातून हुसकावून दिले.

यावरुन नेवासा पोलिसांनी पती सतीश राजेंद्र दाणे, सासू राहीबाई राजेंद्र दाणे, सासरा राजेंद्र भानुदास दाणे, भाया संदीप राजेंद्र दाणे चौघेही रा. धामोरी ता. नेवासा तसेच नणंद रेणुका रवींद्र तागड व नंदाई रवींद्र तागड दोघे रा. टोका ता. नेवासा यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून असून पुढील तपास हवालदार आर. डी. मरकड करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post