कारमधून आलेल्या चौघांनी अडीच लाखाचा ऐवज लुटला

। अहमदनगर । दि.22 जुलै ।   कारमधून आलेल्या चार अनोळखी चोरट्यांनी अडवून मोबाईल, चांदीचे कडे, रोख रक्कम असा दोन लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना आंबेडकर चौक ते औरंगाबाद रोड दरम्यान नेवासा येथे घडली. 

याबाबतची माहिती अशी की सुधीर कुमावत (वय 28, राहणार बेलापूर, श्रीरामपूर) यांना कारमधून आलेल्या चार अनोळखी व्यक्तीने दमदाटी करून अडवले व त्यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल, दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे कडे, 

पाच हजार पाचशे रुपये रोख व 2 लाख 50 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने बळजबरीने घेऊन पसार झाले. या प्रकरणी नेवासा पोलिसांनी सुधीर कुमावत यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस उप निरीक्षक शेवाळे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post