। अहमदनगर । दि.18 जुलै । मध्यरात्रीच्या सुमारास बंद हॉटेलच्या किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला व आतील देशी-विदेशी कंपनीच्या 23 हजार 380 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या. ही घटना नगर तालुक्यातील वाळकी येथील हॉटेल राजहंस येथे घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की लक्ष्मण गोरे (वय 34, राहणार वाळकी, तालुका नगर) यांचे वाळकी येथे हॉटेल राजहंस नावाचे हॉटेल आहे. हॉटेल नेहमीप्रमाणे बंद केलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरांनी हॉटेलच्या किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला

व आतील सामानाची उचकापाचक केली व आतील 23 हजार 380 रुपये किमतीच्या दारूच्या देशी-विदेशी कंपनीच्या बाटल्या चोरून नेल्या. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी लक्ष्मण गोरे यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास सहाय्यक फौजदार लबडे करीत आहेत.