। अवघ्या 24 तासांत गुन्ह्याची उकल
। कोतवाली पोलिसांची कारवाई
। अहमदनगर । दि.22 जुलै । मारहाण करून बळजबरीने चारचाकी व रोख रक्कम पळवून नेणारे सराईत गुन्हेगाराची टोळी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली. अवघ्या 24 तासांच्या आत पोलीस पथकाने तिघाची टोळी गजाआड केली आहे. गौरव राजेंद्र शेवाळे (वय 22 वर्षे, रा. दुधसागर सोसायटी, केडगाव), शरद चंदू पवार (वय 22 वर्षे रा. मतकर मळाजवळ दुबे यांचे खोलीत, देवीरोड केडगाव नगर), राहुल रामचंद्र बोरुडे (वय 25 वर्षे, रा. मोहिनीनगर, केडगाव, नगर) या तिघांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.
21 जुलै रोजी फिर्यादी सचिन बालाजी लेडवे (वय-24 वर्षे, धंदा चालक चक्रपाणी वसाहत, दुर्गामाता कॉलनी भोसरी जि पुणे) हे त्यांचे वाहन ह्यूदाई कंपनीचे असेंट कार नं. एमएच 14 एफ सी 3954 ही पुणे येथून भाडे घेऊन नगर शहरात आले असता, त्यांनी गाडीतील प्रवाशांना नगर येथे सोडून पुन्हा पुणे जाताना कायनेटीक चौकात रोडच्या कडेला त्यांची कार उभी करुन विश्रांती करत होते. तेथे तीन अनोळखी इसम वय अंदाजे 24 ते 25 वर्षे हे त्यांच्याकडील सुझुकी अॅक्सेस मोपेड मोटारसायकलवर येवून त्यांनी फिर्यादीचे कारचा दरवाजा वाजवून तू कार येथे का उभी केली? येथे पार्कींग नाही असे म्हणुन लेंडवे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या खिशातील 4 हजार रुपये व दोन लाख रुपये किमतीची हुँदाई कंपनीची अॅसेंट कार ने एमएच 14 एक सी 3954 ही बळजबरीने घेवून गेले होते.
गुन्हे शोध पथकास माहिती मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार हे केडगाव भागात आरोपींचा शोध घेताना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली. गुन्ह्यातील आरोपी हे केडगाव परीसरात आले आहेत अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे यांना तसे आदेश दिले. त्यानुसार मोठ्या शिताफिने वरील तीन आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले. सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक राकेश मानगांकर, पोसई मनोज कचरे, पोसई मनोज महाजन, पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना नितीन शिंदे, पोना सागर पालये, पोना नितीन गाडगे, पोना शाहीद शेख, पोना बंडु भागवत, पोकॉ सुजय हिवाळे, पोकॉ तान्हाजी पवार, पोकॉ सुमित गवळी, पोकॉ कैलास शिरसाठ, पोकॉ प्रमोद लहारे, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ सुशील वाघेला, पोकॉे भारत इंगळे आदिंनी केली आहे.
