नगर जिल्ह्यात 36 ठिकाणी दारु अड्ड्यावर छापे ; 5 लाख 6 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त

। अहमदनगर । दि.22 जुलै ।  विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक, व जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाई कामी राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 36 ठिकाणी छापे टाकून 5 लाख 6 हजारर 880 रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला.

नगर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुध्द कावाईची विशेष मोहिम राबवून दि.11 जुलै ते दि.21 जुलै दरम्यान 35 ठिकाणी छापे टाकून एकूण 5 लाख 6 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल गावठी हातभट्टीची तयार दारु, कच्चे रसायन, भट्टीची साधने जप्त करुन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

या कारवाईत 38 आरोपी विरुध्द गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये जामखेड, सोनई, नगर तालुका, श्रीरामपूर शहर, राहूरी, कोतवाली, श्रीरामपुर तालुका शिर्डी, भिंगार कॅम्प, व कर्जत, शेवगांव, तोफखाना, एमआयडीसी, संगमनेर तालुका व पाथर्डी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post