हनीट्रॅप ; तिसरा आरोपीही अटकेत

। अहमदनगर । दि.22 जुलै ।  वडगाव गुप्ता येथील हनीट्रॅप प्रकरणातील आरोपी महिला आणि साथीदार गणेश छगन गिर्‍हे (रा.राघुहिवरे, ता.पाथर्डी) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी (दि.20) अटक केल्यानंतर या गुन्हयातील तिसरा आरोपीही पोलिसांनी अटक केली आहे.

अर्जुन नारायण वायभाते (रा.चेतन कॉलनी, नवनागापूर) असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी महिलेचा बनावट पती म्हणून त्याला उभे करण्यात आले होते. या प्रकरणात आता तिघांना अटक झाली आहे.

न्यायालयाने त्याला 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post