विजेचा शॉक लागून कर्मचारी जखमी

। अहमदनगर । दि.16 जून ।  बेलापूर येथे विजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा शॉक लागून एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. मंगळवारी बेलापूर येथील विजेच्या खांबावरील मेंन्टेनन्सचे काम खासगी ठेकेदारामार्फत करण्यात येत होते. त्यांच्या मार्फत गणेश भाऊसाहेब साळुंके हा पोलवर चढून दुरुस्ती करत होता. 

बंद वीज प्रवाह असलेल्या पोलवरील काम आटोपुन साळुंके हा वीज प्रवाह सुरु असलेल्या पोलवर चढला. विजेच्या तारांना स्पर्श होताच, त्यास शॉक बसला व तो खाली फेकला गेला. हवालदार अतुल लोटके, अभिषेक खंडागळे, चेतन जाधव, मधुकर औचिते, यशवंत नाईक, गौरव सिकची, विशाल आंबेकर, संतोष शेलार, गणेश टाकसाळ, किरण बारहाते आदिंनी साळुंके यास हॉस्पिटल येथे दाखल केले.

Post a Comment

Previous Post Next Post