घरेलू कामगारांना दीड हजार रुपयाचे अनुदान देण्यात यावे मागणी

। अहमदनगर । दि.17 जून । टाळेबंदीनंतर हातावर पोट असलेल्या घरेलू मोलकरीण कामगारांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेले दीड हजार रुपयाचे अनुदान घरेलू कामगारांना तातडीने मिळण्याची मागणी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली.

या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रकांत राऊत यांना दिले. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, विना सोनवणे, प्रमिला रोकडे, रेखा पाटेकर, संजीवनी बोरुडे, उषा बोरुडे, पठाण आदी उपस्थित होत्या.

घरेलू मोलकरीण कामगारांना राज्य सरकारने देऊ केलेली दीड हजाराची आर्थिक मदत न मिळाल्यास येत्या दहा दिवसात संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर धुणी-भांडी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुमारे चार ते साडेचार हजार घरेलू कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केली आहे.

राज्य सरकारने पात्र घरेलू कामगारांना दीड हजाराची मदत मंजूर केली. त्यामुळे पात्र घरेलू कामगारांना दीड हजाराची आर्थिक मदत देण्याची मागणी क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त राऊत, कामगार अधिकारी यास्मिन शेख व कामगार अधिकारी बोरसे यांनी स्वीकारून सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

Previous Post Next Post