। मुंबई । दि.09 जून । केरळहून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून मुंबईत धडकला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसराला रात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपले आहे.
दरवर्षी साधारणपणे १० जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होत असते. मात्र यावेळी त्याआधीच मुंबईत मान्सून दाखल झाला आहे अशी माहिती आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक (डीडीजी) डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे.
सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शहर आणि उपनगराच्या परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस पडताना दिसत आहे. या काळात पाऊस असाच सुरु राहिल्यास या भागांमध्ये आणखी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे.
