। बीड । दि.10 जून । पहिल्याच पावसात बीड जिल्ह्यातील परळी-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गाच्या चालू कामाचा खेळ झाल्याचे चित्र पाहिला मिळाले आहे. परळी शहराजवळील कन्हेरवाडी येथे पुलाचे काम सुरू आहे. तात्पुरता वाहतुकीसाठी बनवलेला पुल पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे.
पुल वाहुन गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. परळी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावताच परळी ते अंबाजोगाई मार्गावरील पुलच वाहून गेला आहे. त्यामुळं येणार्या जाणार्या वाहनांना आता या मार्गावरून प्रवास करता येत नाही.
आता वाहन धारकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी निर्माण झाली असून दुसरीकडे पूल वाहून गेलेल्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. मोसमी पावसाला सुरुवात झाली असून नंदागौळ परिसरात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे.
या पावसाचे पाणी घाटातून शेतकर्यांच्या शेतात नदीला आल्याने हा पूल वाहून गेला आहे. यामुळे या राज्य महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वाहनाच्या जवळजवळ दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. दरम्यान नंदागौळ कनेरवाडी घाट परिसरात असलेल्या शेतीचेही फार मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.