करून एकाच्या मुसक्या आवळल्या
। अहमदनगर । दि.15 जून । श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु परिसरात शांताई लॉन्स समोर दि.16 फेब्रुवारी रोजी पोलिस असल्याची बतावणी करून तीन अज्ञात चोरट्यांनी टेम्पोतील 27 हजारांची रोख रक्कम चोरुन नेो होते. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी काष्टी मांडवगण रस्त्यावर सिनेस्टाईल पाठलाग करत एका आरोपीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव अबालु जाफर इराणी वय 47 रा. शिवाजीनगर,पुणे असे आहे.
या बाबत सविस्तर असे की, निमगाव खलु परिसरात शांताई लॉन्स समोर दि.16 फेब्रुवारी रोजी दौंड कडून अहमदनगरकडे जाताना एम.पी .09 आय.एफ.9435 या आयशर टेम्पोला दुचाकी वरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी टेम्पो चालक लखन दशरथ नायर वय 21, व्यवसाय ड्रायव्हर रा.बागवा ता.जि.खरगोन मध्यप्रदेश ) याला आपण पोलीस असल्याचे सांगत टेम्पोतील 27 हजाराची रोख रक्कम चोरुन नेली.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सदर गुन्ह्यात तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करुन, आरोपी विरुध्द पुरावा प्राप्त करून त्या अनुशंगाने तपास करत असताना दि.11 जून रोजी गुन्ह्यातील आरोपीपैकी एक आरोपी मोटारसायकलवर काष्टीमध्ये आल्याची माहिती मिळाली. त्यानूसार श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच तो काष्टी मांडवगण रस्त्याने पळून जाऊ लागला असता. पोलिस कर्मचार्यांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करत शिरूर पोलिस ठाण्याच्या मांडवगण चौकीच्या कर्मचार्यांच्या मदतीने पकडले.
त्याच्याकडेअधिक चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव अबालु जाफर इराणी वय 47 वर्षे, रा.शिवाजीनगर ता.जि.पुणे असे सांगत दोन साथीदारांसह टेम्पो लुटीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी आठ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली यामाहा कंपनीची दुचाकी क्र. एम.एच.14 जे.जे. 5067 असा एकूण 58 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यात घेतलेला आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोना मुकेश बडे, पोकॉ.प्रकाश मांडगे, पोकॉ.किरण बोराडे, पोकॉ.दादा टाके, पोकॉ.गोकुळ इंगवले, पोकॉ.प्रताप देवकाते, पोकॉ.कुलदिप घोळवे, पोकॉ.योगेश दळवी, पोकॉ.अमोल कोतकर यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पो.ना संतोष फलके हे करीत आहेत.
