। पुणे । दि.13 जून । राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षीत असलेल्या संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. पुण्यात सोमवारी दुपारी हीे भेट होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असून याच प्रश्नावर मागील आठवड्यात दोन्ही राजांची होणारी भेट झाली नव्हती. काही दिवसांपूर्वीच या दोघांची भेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी बर्याच उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आज अचानकपणे संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या भेटीची माहिती समोर आली आहे.
सध्या संभाजीराजे छत्रपती राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहरा आहेत. त्यांनी 16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. उदयनराजे भोसले हे संभाजीराजेंच्या पाठिशी उभे राहणार का, हेदेखील पाहावे लागेल.