अहमदनगरची सन्मिता धापटे-शिंदे ठरली महाराष्ट्राची महागायिका

। मुंबई । दि.13 जून । कलर्स  मराठी  वाहिनीवरील सूर नवा ध्यास नवा- आशा उद्याची या रिअ‍ॅलिटी शोचा अंतिम सोहळा रविवारी पार पाडला. या अंतिम सोहळ्यात सहा गायिकांपैकी सन्मिता धापटे - शिंदे हिने बाजी मारली. सन्मिताने महाराष्ट्राची महागायिका होण्याचा मान  पटकावला आहे. महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ध्यास नवा- आशा उद्याची’ या रिअ‍ॅलिटी शोचा अंतिम सोहळा 13 जूनला रविवारी पार पडला. यामध्ये विजेता कोण ठरणार याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. या सोहळ्यात सन्मिता धापटे-शिंदे हिने बाजी मारली असून तिनं महागायिका होण्याचा मान पटकावला आहे.

सहा गायिकांपैकी सन्मिता हिची महाराष्ट्राची महागायिका म्हणून निवड करण्यात आली आहे. रश्मी मोघे, राधा खुडे, प्रज्ञा साने, संपदा माने आणि श्रीनिधी देशपांडे या उत्तम गायनकौशल्य असणार्‍या स्पर्धकांवर मात करत सन्मितानं महागायिका होण्याचा मान पटकावला आहे.

संपूर्ण देशभरातून अनेक स्पर्धकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मात्र, त्यापैकी केवळ 16 स्पर्धकच आपल्या गायनाच्या कौशल्यामुळे महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचले. ’सूर नवा ध्यास नवा’चं हे चौथ पर्व होतं आणि ते अधिकच खास ठरलं कारण यात फक्त गायिकांचाच समावेश होता.

Post a Comment

Previous Post Next Post