। पुणे । दि.14 जून । मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी तसेच आरक्षणाच्या प्रश्नावर छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची नुकतीच पुणे येथे भेट झाली. यावेळी दोघांनी चर्चा केली. यावेळी उदयनराजे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याने एक दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
पुण्यामध्ये छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांची भेट झाली यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्दे मांडले. उदयनराजे म्हणाले की, मराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. जर हे सगळे आमदार, खासदार एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर नेमकी समस्या काय आहे?
उद्धव ठाकरे, अजित पवार सोडून द्या सगळे, मी सगळ्यांबद्दलच विचारतोय. विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्हीलाईव्ह प्रक्षेपण करा. पण हे सभागृहात गेल्यावर एक बोलतात आणि बाहेर आल्यावर दुसरं बोलतात, अशी टीका यावेळी त्यांनी केली. केद्राच्या भूमिकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, दम असेल तर अधिवेशन बोलवावं. आधी राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणप्रश्नी १६ जून रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज समाधिस्थळापासून मूक आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर पुढे पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला उदयनराजे समर्थन देतात का? हे पाहावे लागणार आहे.