। अहमदनगर । दि.01 जून । पाच हजार रुपयांच्या लाच प्रकरणी खादी ग्रामोद्योगचा अधिकारी रमेश श्रीहरी सुरुंग (वय 45) लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, हंगेवाडी (ता-श्रीगोंदा) येथील तक्रारदाराने जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालय अहमदनगरमार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजने अंतर्गत पेव्हर ब्लॉक व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 लाखांचे कर्ज प्रकरण सहा महिन्यापुर्वी महाराष्ट्र बँक, शाखा हंगेवाडी येथे दाखल केले आहे.
सदर प्रकरण अद्याप प्रलंबित असून, ते लवकर मंजुर करुन घेऊन सदर प्रकरणाची सबसीडी लवकर मिळवून देण्याकरिता आरोपीने तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरुन काल दि.31 रोजी लाच मागणी पडताळणीत यातील आरोपीने तक्रारदाराकडे लाचेची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शाम पवरे, पोनि. करांडे, पोना विजय गंगूल, रविंद्र निमसे, राधा खेमनर, संध्या म्हस्के, राहुल सपट यांनी केली.