। अहमदनगर । दि.15 जून । कोरोना परिस्थितीमुळे झालेले आर्थिक नुकसान व आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे कुटूंबिय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. म्हणून मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क सरसकट माफ करावे अशी मागणी मराठा समाजातील चळवळीतील विद्यार्थ्यांनी खासदार संभाजीराजे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी कष्टकरी शेतकरी विद्यार्थी चळवळीतील विनीत गाडे, शुभमक पांडुळे, सचिन सापते, अक्षय खडके, यशवंत तोडमल, संभाजी कदम, भूषण तोडमल, अभिजित दरेकर, योगेश गागरे, मनोज महाजन आदींसह पालकही उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर खासदार संभाजीराजे यांच्याशी विद्यार्थ्यानीं चर्चा केली.
राजेंनी समस्या जाणून घेत मदतीचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना विनित गाडे म्हणाले की, नवीन शैक्षणिक सत्रात सरसकट सर्व मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क सरकारने माफ करावे. मागील वर्षापासून शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.