अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतांनीही जाणून घेतले बचत गटांचे कामकाज

माविमच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते

बचत गटाच्या महिलांना बॅंक कर्ज धनादेश वाटप

अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतांनीही 

जाणून घेतले बचत गटांचे कामकाज


 । अहमदनगर । दि.16 जून ।  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनी मंगळवारी राहुरी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सीएमआरसी कार्यालयास भेट देऊन पाहणी केली तसेच तेथील अधिकारी-कर्मचारी, सहयोगिनी यांच्याशीही संवाद साधला. यावेळी त्यांच्या हस्ते बचत गटातील महिलांना बॅंक कर्ज धनादेश वाटप तसेच कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

 यावेळी उपस्थित महिला बचत गटाच्या सर्व महिलांना मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणासाठी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी माविमच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांच्यासोबत अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूत श्रीमती झाकिया वर्डेक यांनीही येथील बचत गट आणि सीएमआरसीचे कामकाज जाणून घेतले व महिला करत असलेल्या उद्योग व्यवसाय विषयी माहिती घेतली व माविमच्या कामाचे कौतुक केले.

अफगाणिस्तान महिलांसाठी हे एक मैत्रीचे नवे पर्व असेल असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या वेळी रफी केलीवाल, वुमन पॉवर असोसिएशनच्या अध्यक्ष अर्चना शर्मा, डेझी डेवरी, रिमा कपूर, वर्ल्ड ट्रेड सेंटर नवी मुंबईचे मानद सल्लागार जयेश खाडे, स्पिरीच्युअल हिलर श्रीमती सुभी, लिम्का बुक अॅवार्डी मधू लखोटीया तसेच राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई तनपुरे, आयसीआयसीआय बॅंकेचे नाशिक विभागाचे  वैभव भाटिया, सीएमआरसी  कार्यकारणी, राहुरी सीएमआरसीचे सर्व स्टाफ, जिल्हा मुख्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post