। अमरावती । दि.12 जून । येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कोरोना रुग्णालयांना भेट देण्यासाठी नाना पटोले सध्या पश्चिम विदर्भाच्या दौर्यावर आहेत. नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, नक्षलवादी हे लोकतांत्रिक पद्धतीचा विरोध करतात, त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
नाना पटोले यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी करण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने पटोले यांना विचारण्यात आलं, त्यावर नाना पटोले म्हणाले, संभाजीराजे छत्रपती आणि वंचित आघाडी एकत्र आले तर त्याचा फटका शिवशाहीला नव्हे तर पेशवाईला बसेल