। अहमदनगर । दि.12 जून । श्रीगोंदा पारगाव रोड वरील बोरुडे मळ्यात शुक्रवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी राजेंद्र पांडुरंग बोरुडे यांच्या घराचे अज्ञात तीन चार चोरट्यांनी कुलुप तोडुन 1 लाख 26 हजाराचा ऐवज लंपास केला आहे.
चोरी झाल्याची माहिती समजताच शनिवारी सकाळी श्वास पथक ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळास भेट दिली आणि तपासाची चक्रे फिरविली आहेत.
समजलेली माहिती अशी की, राजेंद्र बोरुडे यांच्या बंद घराच्या दाराचे कुलुप चोरट्यांनी तोडले. कपाट्याची उचकपाचक करुन एक लाखाचे सोने व 25 हजाराची रोख रक्कम चोरुन नेली. बोरुडे यांच्या ही घटना सकाळी झोपेतून उठल्यानंतर लक्षात आली.
श्रीगोंदा तालुक्यात भुरट्या चोर्या चालू झाल्या. ही राजेंद्र बोरुडे यांची चोरी जवळपास राहणार्या भामट्यांनी केली असा असा पोलिसांचा अंदाज आहे.
