टेम्पो चालकास मारहाण करुन लुटले

। अहमदनगर । दि.01 जून । लघुशंका करिता रस्त्याच्या कडेला थांबलेल्या छोटा हत्ती टेम्पो चालकासह एकास मोटरसायकलवरून आलेल्या चौघांनी लाथाबुक्क्यांनी व  दगडाने मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम मोबाईल बळजबरीने चोरून नेला. ही घटना मांदळी ते गोंदर्डी रोडवर घडली.

याबाबतची माहिती विशाल देविदास तनपुरे ( राहणार गोंदर्डी तालुका कर्जत ) त्यांचा छोटा हत्ती ( क्रमांक एम एच 16 सी सी 62 40) मधून त्यांचा मित्र प्रतिक दादासाहेब तनपुरे याच्यासह मांदळी ते गोंदर्डी जात असताना सोलापूर रोड वरील उतारा जवळ लघुशंकेकरीता थांबले असता.

त्याच वेळेस दोन मोटरसायकलवरून आलेल्या चौघांनी तू कोण आहे ते काय करतोस असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील 42 हजार पाचशे रुपये किमतीचे दोन मोबाईल वर रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी कर्जत पोलिसांनी विशाल तनपुरे यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असेल अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post