आरोपीला दोन दिवसाची पोलिस कोठडी
महा-ई-सेवा चालू होणाऱ्या तरुणाने शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देतो असे सांगून बनावट पावत्या घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करून प्रसार झालेल्या आरोपी विरुद्ध 13 मार्च 2019 रोजी नगर तालुका पो ठाण्यात भा.द.वी कलम 406, 468 प्रमाणे गुन्हा दाखल होता तेव्हापासून आरोपी नामे दीपक शिवाजी गायकवाड ( वय 27 रा निमगाव वाघा ) हा फरार होता.
दीपक गायकवाड हा त्यावेळी महा इ सेवा केंद्र चालवत असे त्याचा फायदा घेऊन पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन फसवणूक केली होती व फरार झाला होता. लॉक डाउन मध्ये दीपक गायकवाड हा घरी आल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक राजेंद्र सानप, पोलीस उप निरीक्षक धनराज जारवाल, पोलीस नाईक शिंदे ,पोलीस नाईक मरकड,पोलीस नाईक खेडकर यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असून किती शेतकऱ्यांची फसवणूक केली त्याचा तपास सुरू आहे.
