ट्रांसफार्मरसह वाइंडिंग वायरची चोरी

। अहमदनगर । दि.09 मे ।   महावितरण कंपनीच्या सबस्टेशन राहुरी येथून अज्ञात चोरांनी पंधरा हजार रुपये किमतीचे विद्युत वीज रोहित्र करंट ट्रांसफार्मर चोरून नेले. ही घटना वांबोरी येथील महावितरण कंपनीच्या सबस्टेशन येथे घडली.
 

याबाबतची अधिक माहिती अशी की महावितरण कंपनीचे सब स्टेशन मधून अज्ञात चोराने पंधरा हजार रुपये किमतीचे सुपर वाइंडिंग वायर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे विद्युत वीज रोहित्र करंट ट्रांसफार्मर चोरून नेले.
 

याप्रकरणी सुनील सुधाकर हजारे ( वय 38 राहणार खळवाडी वांबोरी तालुका राहुरी ) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार आव्हाड करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post