नव्या २१९१ बाधितांची रुग्ण संख्येत भर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७६ टक्के
। अहमदनगर । दि.25 मे । जिल्ह्यात आज २१९८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ३४ हजार ६६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.७६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१९१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५ हजार ४०२ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५६५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८११ आणि अँटीजेन चाचणीत ८१५ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ०२, जामखेड ६२, कर्जत ०५, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण ७५, नेवासा ७४, पारनेर ४३, पाथर्डी ६६, राहता २८, राहुरी ०३, संगमनेर ६५, शेवगाव ६७, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८१, अकोले ०३, जामखेड ०४, कर्जत १३, कोपरगाव २९, नगर ग्रा.४९, नेवासा ३७, पारनेर २६, पाथर्डी ८२, राहाता ९४, राहुरी ३६, संगमनेर १९, शेवगाव ३०, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर २७९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ आणि इतर जिल्हा १० आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ८१५ जण बाधित आढळुन आले. मनपा २५, अकोले ३९, जामखेड ३६, कर्जत ३९, कोपरगाव ५०, नगर ग्रा. ३१, नेवासा ४८, पारनेर ८८, पाथर्डी ७१, राहाता ३६, राहुरी ३९, संगमनेर ८७, शेवगाव ५४, श्रीगोंदा १२६, श्रीरामपूर ३९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२६, अकोले ११०, जामखेड ८५, कर्जत १३३, कोपरगाव १२८, नगर ग्रामीण १२९, नेवासा २९४, पारनेर १६०, पाथर्डी १७९, राहाता ९४, राहुरी १६०, संगमनेर १११, शेवगाव १११, श्रीगोंदा १८८, श्रीरामपूर १४२, कॅन्टोन्मेंट ०२ आणि इतर राज्य ४६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:२,३४,६६५
*उपचार सुरू असलेले रूग्ण:१५४०२
*मृत्यू:२९०३
*एकूण रूग्ण संख्या:२,५२,९७०
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक २५ मे, २०२१
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
