विदयार्थ्यांना घरपोच धान्य देवून दिलासा राष्ट्रीय पाठशाळेचा उपक्रम

 
गोरगरीब विद्यार्थ्यांना घरपोच 
धान्य देवून अडचणीच्या काळात मोठा दिलासा

। अहमदनगर । दि.25 मे । स्टेशन रोड येथील जिल्हा सहकारी बँके समोरील राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल चा विदयार्थ्यांना घरपोच धान्य देवून गोरगरीब शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना दिलासा.
राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल या विदयालयातील शिक्षकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे . 
 
शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विदयार्थ्यांकरीता शासनातर्फे हरबरा , मसूरदाळ हे धान्य वितरणासाठी आले होते.शाळेतील काही विदयार्थी लॉकडाऊन मुळे बाहेरगावी राहण्यास गेलेले आहेत व सध्या ब्रेकदिचेन मुळे जिल्हा प्रवेश बंदी प्रवासास बंधणे असल्याने पालकांना धान्य घेऊन जाण्यात अडचणी येत होत्या.त्यावर शाळेने सदर विदयार्थ्यांचे धान्य विदयार्थ्यांच्या गावी घरपोहच देण्याचे नियोजन केले.
 
या लॉक डाऊन काळामध्ये गोरगरीब पालकांना धान्य दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसले. या उपक्रमास मनपाचे प्रशासनाधिकारी पवार साहेब यांनी प्रोत्साहन देवून घरपोच करण्यास परवानगी दिली . 
 
शाळेतील मुख्याध्यापक श्री जगन्नाथ बोडखे बाबासाहेब लोंढे सतीश काळे संजय सकट रामनाथ घनवट श्री आबासाहेब बेडके कविराज बोटे, प्रवीण ऊर्किडे,व सर्व शिक्षक यांनी सामाजिक अंतर राखून गटाने नगर, पाथर्डी, शेवगाव, बिड, गेवराई, शिरुरकासार या तालुक्यातील विविध गावांमध्ये जावून गोरगरीब विद्यार्थ्यांना घरपोच धान्य देवून अडचणीच्या काळात मोठा दिलासा दिला आहे . 
 
शाळेच्या या उपक्रमाचे संस्थेचे सचिव अँड.विदयाधर काकडे , जिल्हा परिषद सदस्या व जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या सौ.हर्षदाताई काकडे , शाळेचे शैक्षणिक विभागाचे प्रमुख लक्ष्मण बिटाळ यांनी मोठे सहकार्य केले

Post a Comment

Previous Post Next Post