प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि सुरक्षा बिमा योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन

प्रधानमंत्री जीवन ज्योती आणि सुरक्षा बिमा

 योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन

रक्कम ऑटो डेबिट होणार; किमान रक्कम 

खात्यात ठेवण्याचे अग्रणी बँकेचे आवाहन


। अहमदनगर । दि.29 मे । प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचे नूतनीकरण ऑटो डेबिटच्या साह्याने बँका करीत आहेत. प्रधान मंत्री जीवन ज्योति विमा योजना मध्ये रुपये 330 तर प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना मध्ये रुपये 12 इतकी रक्कम खात्यात असणे आवश्यक आहे.


दिनांक 31मे 2021 पर्यंत ही रक्कम ऑटो डेबिट होणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्यावर आवश्यक जमा रक्कम ठेवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी बँक (सेंट्रल बँक ऑफ इंडिया ) व्यवस्थापक संदीप वालावलकर यांनी केले आहे.

सध्या देशात कोरोंनाची दुसऱ्या लाटेने सर्व नागरिक त्रस्त आहेत. काही लोकांना जीव गमवावा लागला. कुटुंबातील कर्ता मृत्यू पावल्यास कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळे विमा सुरक्षा म्हणून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post