याबाबतीची अधिक माहिती अशी की, प्रतिप रामदास बोराडे (वय 31, रा.लक्ष्मी कॉलनी, तपोवन रोड, कसबे वस्ती,सावेडी) हे त्यांच्या कुटुंबासह आठ मार्चपासून धानोरा तालुका अष्टी जिल्हा बिड येथे राहत असताना त्यांच्या तपोवन रोडवरील बंद घराशेजारी राहत असलेले बाळासाहेब पोकळे यांनी त्यांना शुक्रवारी दि.21 रोजी सकाळी फोन करुन सांगितले की,
तुमच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला आहे. तसेच तुमचे शेजारी राहणारे अंकुश भगवानराव सांगळे (वय 32), सुजित पद्माकर शेळके (वय 36, रा.नाना चौक, कसबे वस्ती, तपोवरोड) व महेश संतप शिकारे (वय 27 रा.नानाचौक कसबे वस्ती) यांच्या ही दुकानाच्या दरवाजाचे कडी कायंडा तोडला आहे.
असे चार ठिकाणी चोर्या झाल्या आहेत. ही माहिती फोनवरुन मिळताच प्रतिप बोराडे हे धानोर्यावरुन तपोवन रोडवरील घरी आले. त्यांनी घरात जावुन पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त अढळून आले. व घरातील 9 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे तिन ओम प्रत्येकी एक एक ग्रॅम वजनाचे व चांदीच्या दोन भार वजनाचे पैजन चोरीस गेल्याचे निदर्शनात आले.
याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी प्रदिप बोराडे यांच्या फिर्यादीवरुन भादवी कलम 454, 457, 380, 511 प्रमाणे घरफोडीच्या गुन्हयाची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक अंबादास आंधळे हे करीत आहेत.
